देखणे ते चेहरे , जे Fair and Lovely चे ।
काळे की सावळे, छापिल मोल सर्वा सारखे ॥
तेच चेष्मे देखणे, जे कोन्डीती तीरप्या नजरा ।
वोळिती दु:खे प्रेमविरान्चे , सांडिती मधुशाला ॥
देखणे ते ओठ, की जे करीती धुम्र लीला ।
आणि ज्यान्च्या वलयाने वेढे संपुर्ण नभमंडला ॥
देखणे ते हाथ ज्यानी निर्मिले कानाखाली कानठळे ।
नंतर वाजले ते मंगलमय ध्वंनीचें कर्णमुखी सोहळे ॥
देखणी ती PARAGON, जी पाठीमागे चालती ।
वाळवंटातुन चालतो BATA , काय तमा ती झीजण्याची ॥
देखणा तो हातरुमाल , जो ये चेहरा स्वच्छ:तेला ।
लाभला छान साडे सहा रुपया,घाम टीपन्यास हा ॥
देखणा स्वप्नांन्त तो, जो ठायी बार प्यासा ।
Jony Walker (लाल,काळा,निळा) रेचुन जातो, प्रेमगर्भि चकना व शेंगदाणा ॥
--Sudarshan