1990 च्या दशकात ज्या काही राष्ट्रीय अंतर राष्ट्रीय घडामोडी झाल्या त्याचा अंदाज बांधणे आताच्या पिढीला तसे अवघड आहे. अखाती युध्द, सोवियत रशिया चा अस्त,जर्मनी चे एकीकरण, शीत युध्दा चा अस्त ह्या सर्व घटनांचा भारतावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष होणारा आर्थिक, राजकीय वा सामाजिक परिणाम. उदारमती धोरणंचा जगभर पाठपुरावा ही याच दशकात झाला, त्याचा एक भाग म्हणून माहिती व माध्यम यांचा अचानक होणारा मारा.आजूबाजूचे सगळे जगच बदलत होते. त्याच दरम्यान भारताचे राजकीय व सामाजिक वातावरण मंदिर - मशीद,मंडळ आयोग , बोफोर्से प्रकरणाने ढवळून निघाले होते. ह्या सर्व गदारोळ मधे भारताला 21 व्या शतका मधे घेऊन जाण्याचे स्वप्न तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पहिले ; सर्व तरुण मनामधे एक अपेक्षाचं व उत्चाहाचा वातावरण तयार केल होत.
21 मे 1991 ला राजीव गांधी यांचा खून झाला आणि संपूर्ण देश हादरला, राजीव गांधी भारताचे एक अपूर्ण स्वप्न. ऑक्टोबर 1984 मधे इंदिरा गांधीची हत्या झाल्यानंतर त्यांना अनपेक्षितपणे देशाची धुरा सांभाळावी लागली. अतिशय विश्वासने देशा ला 21 व्या शतकाचे स्वप्न पाहत असता आजूबाजूच्या राजकीय दलदलि मधे ते केव्हा गुरफटले गेले ते कळता - कळता ५ वर्ष निघून गेली. सार्वत्रिक निवडणुका मधील पराभव व त्या नंतर विरोधी पक्ष म्हणून काम करताना त्यानी लोकांशी संपर्क करता करता आत्म् परीक्षण वा सार्वजनिक रीत्या आपल्या चुका लोका मधे जाऊन मान्य करायला चालू करत असता,लोकाना हा नेता आता पुन्हा जवळचा वाटू लागला.१९९१ च्या सार्वत्रिक निवडुणका मधे राजीव पुन्हा बहुमताने निवडून येण्याचे स्पष्ट भकिते होऊ लागली आणि इथेच "मद्रासकेफे" च्या कथानकाची बीजे रोवली जातात, आणि उलगडतो प्रवास एका षड्यंत्राचा / राजकीय खुनाच्या कटाचा. सामान्य माणसाला ज्या वेळी अश्या घटनांच दूरदर्शन,रेडियो,वृतपत्रे ह्या माध्यमातून आकलन होत ते त्याच्या जाणिवे ला झेपेल एवढ्या पुरते मर्यादित असते का ? का त्याचा एक, दुसरी किंवा अनेक बाजू असतात? राजीव गांधी यांच्या खुनाच्या कितीतर बाजू मद्रास केफे उलगडत नेतो. भारतीय गुप्तचर खात्याचे कार्य किंवा एकंदर अश्या संस्था चे काम कसे असते, हे आतापर्यंत हिंदी चित्रपटा मधे इतक्या प्रभावी पणे ह्या पुर्वी मांडल्याचे मला तरी आठवत नाही.पंतप्रधान पदाच्या पातळीवर राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत निर्णय कसे घेतले जातात ह्याचे विश्लेषण काही व्यक्तिरेखा व विक्रम सिंग या कथेच्या नायकाच्या द्वारे मांडले आहे. अंतर्गत राजकारणा पेक्षा राष्ट्रीय हीत कसे जोपासले जायला पाहिजे हे पश्चिम देशाना भारताच्या सीमे जवळ येण्यापासून प्रबंध घालण्यासाठी शांती सेना पाठीवन्यचा निर्णय हा कथेच्या ओघामध्ये अतिशय प्रभावी पणे प्रस्तुत केला आहे. भारत हा अस्वस्थ व कपटी शेजाऱ्यांनी वेढलेला देश आहे व ह्या सर्व front वर काम करत असता राजकीय नेतृत्व , गुप्तचर व सेना दले यांच्यावर राष्ट्रीय व अंतर राष्ट्रीय राजकारण व दबाव प्रभावी पणे मांडले आहे . राजकीय हत्ये मागे पश्चिमी गुप्तचर संघटना यांचा उल्लेख टाळला असला तरी दिग्दर्शकाने तो हुशार प्रेक्षका साठी पेरून ठेवला आहे.
सिनेमा ची सुरुवात विक्रम सिंग या आर्मी अधिकारी पासून सुरु होते , विक्रम सिंग ह्यास RAW ह्या भारतीय गुप्तचर संघटने द्वारे जाफना इथे एका खास mission वर पाठवले जाते. श्रीलंके मध्ये शांती प्रक्रिया चालू करून तिथे लोकशाही मार्गाने निवडणूक घेण्यासाठी अपेक्षित वातावरण व परस्थिती निर्माण करणे. LTF मध्ये फुट पाडून लोकशाही पर्याय निर्माण करणे हा मुख्य उद्देश. पण त्या प्रवास मध्ये उलगडणारा माजी पंतप्रधान हत्येचा कट, तो थांबिवाण्यासाठी गुप्तहेर अधिकाऱ्यांनी केलले प्रयत्न व त्याला आलेले अपयश .हा सर्व घटनाक्रम अतिशय प्रभावी व कुठेही कंटाळवाणा न होऊ देता दिग्दर्शकाने मांडला आहे. सिनेमा ची विक्रम सिंग हे व्यक्तिरेखा काल्पनिक असली तरी बराच सिनेमा हा सत्य घटना व बराच संशोधन करून मांडला आहे त्या मुळे कोठे ही नकली वाटत नाही. दशहत वादी नेतृत्व हे दशहतवादा च्या मानसिकतेच्या आहारी जाऊन लोकशाही चे सर्व मार्ग कसे बंद करत किंवा तसे करणे त्यांना अनेक कारण मुळे शक्य नसते सामान्य व निरपराध माणसांचा कसा बळी जातो व हे अंतर्भूत करण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.
सिनेमा तांत्रिकदृष्ट्या अतिशय सक्षम झाला आहे , LTF चे बेस कॅम्प , ग्रह युद्धाच्या गडद छटा, कथा उलगडत जात असता आकाश्यातून भिरभिरणारी helicopters . आर्मी आणि LTF चे युद्ध आणि त्या वेळी केलेली कॅमेरा हंड्लिंग ,गुर्रीला युद्ध, वेगवेगळ्या locations वर उलगडणारा plot हा दृषां द्वारे व कोठेही शब्द बंबाळ न करता स्टोरी telling करताना दिग्दर्शकाचे कसब व प्रेक्षकांच्या बुधीमते वर टाकलेला विश्वास ह्या दोन्ही गोष्ठी जाणवतात.
Hollywood च्या तोडीचे निर्मिती मुल्ये असणारा असा हा चित्रपट , कथेचा नायक शेवटी ज्या वेळी चर्च मध्ये पादरी च्या "पर जिते कौन ?" ह्या प्रश्नाला " पता नाही ,but I lost my prime minister ". असा म्हणतो त्या वेळी सामाजिक , आर्थिक,राजकीय ,राष्ट्रीय , अंतर राष्ट्रीय brutal राजकारणाच्या च्या अनुभुवा तून परत भारताला २१ व्या शतक कडे नेण्याच्या स्वप्नाचा अकाली अंत संवेदशील मनाला व नवीन पिढीला इतिहासाकडे वेगवेगळ्या अनुशंगाने पाहायला लावण्यचा एक प्रमाणिक व यशस्वी प्रयत्न होऊन जातो . नक्कीच पाहावा असा. एक अनुभव.