Saturday, April 5, 2014

ध्यासपूर्तीतून निर्माण होतोय “मुक्काम पोस्ट धानोरी”


मुक्काम् पोस्ट् धानोरी (MPD) च्या निर्मितिची संकल्पना खुप् मनोरन्जक् आहे, संगणक् क्षेत्राशी निगडीत् दोन् मित्र सुदर्शन् वराळे व महेश् राजमाने हे MPD विषयी बोलताना सांगत् होते..आम्ही नेहमी हॉलीवुड्, बॉलीवुड्, टॉलीवुड् आणि अगदी जॅपनीज्, चायनीज् कोरि‌अन्, जागतिक्, आणि मराठी चित्रपटांची चर्चा करायचो. आमचा चित्रपट्निर्मितीचा ध्यासच् आम्हाला चित्रपट् निर्मितीच्या धाडसाकडे घे‌उन् गेला. अगदी अमेरिके मधील् चांगल्या पगाराच्या नोक-या सोडुन् भारतात् परतण्या पर्यन्तचा हा ध्यास् म्हणजे मित्र् म्ंडळी ना मुर्ख पणाचा नि्र्णय वाटला. पण् एक् ठरवीले होते, काही झाले तरी पुण्या मधे नोकरी करुन् अपले छन्द् आणि ध्यास् पु्र्ण करायचा.आणि हो निर्मितीची सुरुवात् ही कथेपासुनच् होते !

आम्ही खुप् लेखकांशी संपर्क् साधला, वेगवेगळ्या लोकांशी चर्चा केल्या. हे सगळं तेंव्हा चालु होत्, साधारण् २००९-२०१० मधे, जेंव्हा विनोदीकथा, प्रेमकथा आणि सामाजिक् आशयावरच्या कथा अगदी ढिगानी मिळत् होत्या. पण् एखादी अशी सरळ् कथा ज्यामधे साहस्/ धाडस् आणि थरारक् मनोरंजन् असेल्, मिळणं अगदी दुस्तर् , अवघड् दिसत् होतं. आणि यामुळेच् आम्हाला आमची कथा लिहिण्याची उर्मी मिळाली. यातुनच् एका छान् कथेने जन्म् घेतला ज्यामधे एक् ब्ंडखोर् मुलगी तिच्या दोन् मित्रांबरोबर् धानोरी नावाच्या एका दुरच्या खेड्यामधे फिरायला जाते.
यातल्या ब्-याचशा गोष्टींची चर्चा आम्ही पुण्याजवळच्या कोंढाणा किल्ल्याच्या पायथ्याशी बसुन् केली आहे. प्रत्येक् आठवड्याच्या शेवटी आम्ही जंगलामधे जा‌उन् बसायचो एक् रेकॉर्डर् सोबत् घ्यायचो आणि आमच्या कथेशी संदर्भित् चर्चा , वादविवाद् रेकॉर्ड् करायचो. एका कथेची पटकथा आणि त्यातुन् संपुर्ण् संहिता तयार् व्हायला जवळजवळ् ३ वर्षाचा काळ् लागला. पण् आता जेव्हा आम्ही मागे वळुन् बघतो तेंव्हा तो काळ् खुप् सुंदर् घालवला असं जाणवतं.
कथेमधल्या प्रत्येक् पात्राचं एक् वेगळं वैशिष्ठ्य् आणि महत्व् आहे आणि ते कथेमधे अगदी चपखल् बसलं आहे. चित्रपटाचे संवाद् अगदी अर्थपुर्ण् आहेत्. आणि कथा खुप् वेगवान् आहे म्हणजे कुठेही अर्थहीन्, रटाळ् दृष्य् दिसणार् नाहीत्. प्रत्येक् दॄष्य् कथेला पुढे नेण्यास् मदत् करतं. चित्रपटामधे खुप् सारे स्पेशल् इफ़ेक्ट्स् आहे आणि ते फक्त् क्रोमा नाहियेत् तर् ख्-या जगातल्या काही दॄष्यांचं ३ डी घट्क् वापरुन् मिश्रण् केलेलं आहे. आम्हाला अशी आशा आहे की असं काही प्रेक्षकांच्या लक्षातही येणार् नाही (आणि तरच् ते सर्वोत्तम् सी जी ठरेल् ना! )

या चित्रपटाच्या कथेची आणखी एक् जमेची बाजु म्हणजे ही तरुण् लोकांची कथा आहे, शहरामधल्या, कॉलेज् तरुणांची,आणि त्याच् वेळेला त्यामधे ग्रामीण् बाज् पण् आहे जो खेडेगावातल्या आणि त्याचबरोबर् शहरामधल्या प्रगल्भ् प्रेक्षकांना रुचेल्, आवडेल्. समाजामधल्या सगळ्या स्तरातल्या आणि भागातल्या लोकांना पटेल्, रुचेल् असा कथाविस्तार् करणं हे आमच्यासाठी खरंच् एक् मोठं आव्हान् होतं आणि मला असं वाटत् की आम्ही ते शिवधनुष्य् अगदी समर्थपणे पेलेलय्.
एकदा आमच्या हातात् चांगली कथा असल्यावर्, पुढची पायरी होती ती म्हणजे कथेला न्याय् देणारे कलाकार् मिळणे. एका बाजुला आम्हाला आमच्या टीमबरोबर् (कथालेखक्, दिग्दर्शक्, सहा.दिग्दर्शक् ) कथेचा उहापोह् करायचा होता की जेणेकरुन् कथेचे पटकथेत् रुपांतर् करायचे होते. ही एक् अशी स्थिती होती की आमची कथा एका विशिष्ट् वळणाने जाणं आवश्यक् होतं आणि प्रत्येक् प्रसंगात् कथेच्या अनुषंगाने जाणारी वळणे असायला हवी होती. (जर् उत्कर्षबिंदु एकच् असेल् तर् एकच् नाट्यमय् वळण्... ) आणि दुस्-या बाजुला कलाकारांचा शोध् घेण्याचं काम्.. या सगळ्यासाठी वर्तमानपत्रात् जाहिराती देणं, अभिनयाच्या कार्यशाळाशी संपर्क् साधणं वगैरे गोष्टी चालु झाल्या.

आमचा पहिलाच् चित्रपट् असल्यामुळे, आमच्यापुढे खुप् अनन्य् आव्हाने होती. आम्हाला कोणत्याही प्रस्थापित् कलाकाराबरोबर् जायच् नव्हतं याचं मुख्य् कारण् म्हणजे पुर्वग्रह्. प्रत्येक् नटाची एक् खुमारी असते आणि खरं तर् प्रेक्षकही त्याच्याकडे त्याच् प्रकाराने पहात् असतात्. (नट् आणि नटी हे दोनही यात् आले.) व्यक्तिरेखेच्या पुर्वग्रह् दुषित् नजरेतुन् प्रेक्षकांना बाजुला ठेवण्यासाठी आम्ही नव्या चेह्-यांचा शोध् घ्यायचं ठरवलं. त्याचवेळेला आम्हाला पैशाच्याही मर्यादा होत्या. कुठलही पुरेसं आर्थिक् पाठबळ् नसताना अगदी कमी बजेट् मधे चित्रपट् बनवण्याचा आमचा मानस् होता. (त्याबद्द्ल् सवीस्तर् नंतर्..)

आमचं मुख्य् पात्र् पुजा हिला काही मारामारीचे सीन् करायचे होते आणि त्यासाठी थोडसं मार्शल् आर्टचं प्रशिक्षण् घेतलेल्या अभिनेत्रीची गरज् होती. (आम्हाला आमचे फ़ा‌इट् सीन् आजिबात् मुर्खासारखे दिसायला नको होते,जे या ना त्या प्रकारे,विस्मयकारकरित्या,आपल्या चित्रपट् क्षेत्रात् चालुन् जातात्.) या सगळ्यात् , आणि ह्या दोन् वस्तुस्थिती, की आमचं कुठेही नाव् झालेलं नसताना आणि अगदी नविन् प्रोडक्शन् हा‌उस् असताना ऑडिशन् म्हणजे एक् दु:स्वप्न् होतं.. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सातारा आणि पुण्यात् मिळुन् जवळजवळ् ५० ऑडिशन् घेतल्या.

आम्हाला तरुण् आणि चतुरस्त्र् नविन् चेहरे हवे होते, जे नविन् लोकांबरोबर् काम् करण्याची जोखिम् उठवायला तयार् होते. ६ महिने ऑडिशन् घेतल्यानंतर् आम्हाला आमच्या व्यक्तिरेखेशी जुळणारे चेहरे मिळाले.. या सहा महिन्याच्या कालावधीत् आम्ही आमची मुख्य् पात्रं ३ वेळा बदलली. त्यातले काही , जेव्हा आम्ही तालीम् चालु केली तेव्हा आमच्या अपेक्षेप्रमाणे त्या त्या व्यक्तीरेखांशी चपखल् बसले नाहीत् ,आणि काही जणांनी त्यांच्या वैयक्तिक् कारणांमुळे काम् सोडुन् दिले. वेळ् निघुन् चालला होता, पण् कामाचा दर्जा जास्त् महत्वाचा होता. आणि म्हणुनच् योग्य्, साचातल्या व्यक्तिरेखा मिळेपर्यंत् आम्ही तेव्हढा काळ् वाट् पाहिली. आम्ही कलाकारांबरोबर् संहितेचं वाचन् सुरु केलं, आणि आमचं प्रत्यक्ष् शुट् सुरु करण्यासाठी बळकटी आणली..

बऱ्याचअंशी मराठी चित्रपटात संस्मरणीय असे संवाद नसतात. पण मुक्काम पोस्ट धानोरी हा चित्रपट अशा संवादांनी अगदी पुरेपुर भरलेला आहे. हा सिनेमा मराठी इतिहासात अशा प्रकारचा पहिलाच सिनेमा असेल. ह्या चित्रपटाची मुख्य व्यक्तीरेखा ही एक तरुण मुलगी असली तरी तात्विकदृष्ट्या "कथा" हीच खरी नायक आहे त्या मुळे चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा ही आपलं अस्तित्व समर्थपणे मांडते.
यामधले स्पेशल इफ़ेक्ट्स असे आहेत की जे मराठी मधे तर कधीच झालेले नाहीत पण बॉलीवुड मधे सुद्धा आत्ता आत्ता दिसायला लागले आहेत. मागील एक पुर्ण वर्ष या चित्रपटाच्या केवळ स्पेशल इफ़ेक्ट्स वर काम चालु आहे. हे काम म्हणजे केवळ क्रोमा शुट करुन बॅकग्राऊंड बदलणं एव्हढ्च नसुन, ३डी गोष्टी निर्माण करुन त्या कॅमे-याबरोबरच्या फ़ुटेज बरोबर वापरल्या गेल्यात, एव्ह्ढच नाही तर चित्रपटातील पात्र त्यांच्याशी संवाद देखील साधतात. ब-याच ठिकाणी प्रेक्षकांना यातलं खरंखोटं ओळखुसुद्धा येणार नाही. यातले इफ़ेक्ट्स जरी अगदी उच्च तंत्रज्ञानातले असले तरी आमची पात्रं अगदी साधी आहेत.आणि हे दिग्दर्शकानी अगदी जाणुन बुजुन केलं आहे.

 परिस्थिती कितीही असामान्य असली तरी तिचा सामना करणारी माणसं ही सामान्यच अ्सतात. त्यांचं कर्तुत्व मात्र असामान्य वाटायला पाहिजे, आणि मुक्काम पोस्ट धानोरी मधे हे अगदी बरोबर साधलं गेलय. व्यावसायिक चित्रपटाचा झगमगाट या चित्रपटात अगदी दुर्मिळ दिसेल, पण कदाचित आजकाल व्यावसायिक चित्रपटाचं ज्याच्याकडे दुर्लक्ष होतय असे घट्क MPD मधे अगदी पुरेपूर आहेत.आणि यातला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे प्रेक्षकांशी समरस होणं. यासाठी दिग्दर्शकद्वयीने सगळे कलाकार नविन घ्यायचे ठरवले. आज असे प्रयोग पडद्यावर आधीच यशस्वी झालेले दिसतायत.
MPD ची सगळी टीम नवीन लोकांची आहे, यातले स्पेशल इफ़ेक्ट्स देणारी सुदधा कॉलेजची मुलं आहेत, जे आपलं कॉलेज, अभ्यास सांभाळत हे काम करतायत. त्यासाठी आम्ही कॉलेजमधे जाऊन काही निवडक मुलं निवड्ली की जी तळमळीने या कामात स्वत:ला झोकुन देतायत आणि त्याचं फारच चांगलं परिणाम स्वरुप आम्हाला दिसुन येतय.

. चित्रपटामधे भरपुर action sequences आहेत. त्यासाठी आमच्या मुख्य पात्र सादर करणा-या कलाकारांना fight चं प्रशिक्षण घ्यावं लागलय. fight चे सगळेच प्रसंग अगदी वास्तववादी आहेत आणि त्यामुळेच ते सामान्य माणसाला अनुसरुन आहेत असं म्हणता येईल.
आता चित्रीकरण् संपलय् आणि चित्रपट् त्याच्या निर्मितीपश्चात् प्रक्रियेत् प्रदर्शनाच्या मार्गावर आहे, आम्ही सगळे त्याचा आस्वाद् घ्यायला अगदी उत्सुक् आहोत्. आम्हाला खात्री आहे की लोकांना या चित्रपटाची कथा नक्की आवडेल्. आमच्यासाठी मायबाप् प्रेक्षकच् सर्वकाही आहेत्. ते कदाचित् आम्हाला मुर्ख् ठरवतील् किंवा आम्ही मराठी चित्रपटाच्या इतिहासात् मैलाचा दगड् ठरु. आणि अम्हाला खात्री आहे की तसच् घडेल्.....
एकूणच मराठी तरुण आणि प्रगल्भ मनाला अश्या शैली चा चित्रपट हा अनुभवायला मिळणे हा दुर्लभ प्रकार ..म्हणून हा प्रामाणिक प्रयत्न..